Ad will apear here
Next
कास पठारावरील रानफुलांच्या बहराला सुरुवात; यंदाचा हंगाम सुरू
पाऊस अधिक असल्याने दहा सप्टेंबरनंतर अधिक बहरण्याचा अंदाज

पुणे : दुर्मीळ जातीच्या रानफुलांनी बहरणारे कासचे पठार बघण्यासाठीची पर्यटक, अभ्यासकांची प्रतीक्षा आता संपली आहे. एक सप्टेंबरपासून वन विभागाने येथे भेट देण्याकरिता नावनोंदणी सुरू केली आहे.  


‘दर वर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारा कास पठारावरील फुलांचा हंगाम यंदा पावसामुळे लांबला आहे. आता काही फुले फुलायला लागली असून, पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरत आहे; मात्र तीन सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने फुले फुलण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. ऊन पडले तर फुले चांगली बहरतील. साधारण दहा सप्टेंबरनंतर पठार चांगले बहरेल,’ अशी माहिती कास पठार समितीचे सोमनाथ जाधव यांनी दिली. एक सप्टेंबरपासून सुमारे दोन हजार पर्यटकांनी येथे भेट दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. 


‘युनेस्को’ने कास पठाराला ‘वर्ल्ड हेरिटेज साइट’चा दर्जा दिल्यानंतर गेल्या सात वर्षांत फुले बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दर वर्षी साधारण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पठारावर फुलांचे ताटवे फुलायला सुरुवात होते. त्यामुळे हौशी छायाचित्रकार, पर्यटक, अभ्यासक पठार बघायला येतात. यंदा मात्र पाऊस जास्त असल्याने इथली रानफुले फुलण्यास उशिरा सुरुवात झाली आहे. साधारण ऑक्टोंबरअखेरपर्यंत हा हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे.


तीन वर्षांपूर्वी कास पठाराला भेट देणाऱ्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेल्याने इथली जैवविविधता धोक्यात आली होती. सुट्टीच्या दिवशी पठारावर ५० ते ६० हजार पर्यटक हजेरी लावत होते. त्यामुळे वन विभागाने पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. या वर्षीदेखील सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या तीन वेळांमध्ये तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांनी आठवड्यातील इतर दिवशी पठारावर यावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. येथे जाण्याआधी ऑनलाइन बुकिंग करणे आवश्यक असून, त्यासाठी https://www.kas.ind.in/ या वेबसाइटला भेट द्यावी, असेही वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

(कास पठाराविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZZBCE
 I would like to visit kas pathar .at September end
 Tourists can destroy . Strict control is absolutely necessarily . It should

be rigorously , mecifully enforced . Environment around the Everest

Is a disaster .
Similar Posts
रानफुलांचा प्रदेश : कास पठार साताऱ्याजवळचं कास पठार हा भूलोकीचा स्वर्ग आहे. निसर्गानं काही ठिकाणंच अशी घडवून ठेवली आहेत, की तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे, तिथल्या वातावरणामुळे त्या ठिकाणांना अप्रतिम सौंदर्याचं वरदान लाभतं. कास पठारावरही त्याचीच अनुभूती मिळते. ‘चला भटकू या’मध्ये आज कास पठारावर सहल...
कोकणातील रानफुलांचा खजिना साताऱ्यातलं कास पठार रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. प्रचंड जैवविविधता तिथे पाहायला मिळते. ते तर सुंदर आहेच; पण कोकणातही रानफुलांची मोठी विविधता पाहायला मिळते. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं फुलायला सुरुवात होते. तो बहर मग पाऊस संपल्यानंतरही अगदी नवरात्रापर्यंत असतो. त्यापैकीच काही रानफुलांचा हा व्हिडिओ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language